

Revised Definition of Wages Under New Labour Codes
sakal
डॉ. दिलीप सातभाई (ज्येष्ठ चार्टर्ड अकाउंटंट- सीए )
कायदा
वेतन संज्ञेची व्याख्या
मूळ वेतन या शब्दाची नवी व्याख्या म्हणजे बेसिक पगार, महागाई भत्ता आणि रिटेनिंग अलाउन्स हे एकूण वेतनाच्या किमान ५० टक्के असावे, अशी अनिवार्यता करण्यात आली आहे. पूर्वी कंपन्या बेसिक कमी ठेवून घरभाडे भत्ता, स्पेशल अलाउन्स, इतर भत्ते काही अंशी अधिक देऊन ‘मूळ वेतन’ कमी दाखवू शकत होत्या, ज्यामुळे पीएफ, ग्रॅच्युइटीसाठी भरावयाची रक्कम त्यामानाने कमी होत होती. या नव्या नियमांनी मूळ वेतन वाढविण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे, ‘सीटीसी’ तशीच राहिली, तर भत्ते कमी होण्यामुळे कर्मचाऱ्यांचा घरी नेण्याचा (टेक होम) पगार थोडा कमी होण्याची पुरेपूर शक्यता आहे, त्यामुळे, कर्ज पात्रता योग्यतेवर व मासिक खर्चावर तत्काळ नकारात्मक परिणाम होऊ शकतो. मात्र, दीर्घकालीन दृष्टीने हे निवृत्तिनियोजन बळकट करेल आणि सामाजिक सुरक्षा वाढवेल.