

Inflation Rises
esakal
Retail Inflation Rises: देशात दैनंदिन वापरातील जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या खिशावरचा ताण पुन्हा एकदा वाढला आहे. ऑगस्ट २०२६ मध्ये ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित देशातील किरकोळ महागाई दर वाढून ४.८२ टक्क्यांवर पोहोचला आहे. सरकारने जारी केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, या कालावधीत सर्वसामान्य किरकोळ महागाईच्या तुलनेत अन्नधान्य आणि खाद्यान्नांच्या महागाईचा भडका अधिक उडालेला पाहायला मिळाला.