

Indian Banking System
E sakal
Indian Banking System: Evolution, Reforms, and Customer Service Challenges
डॉ. अनिल धनेश्वर
anil.dhaneshwar@gmail.com
बँकिंग व्यवस्था तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी सरकार विविध पातळ्यांवर प्रयत्न करत आहे. खासगी क्षेत्रातील बँकांनाही याच उद्देशाने परवानगी देण्यात आली, तसेच अलीकडच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने गावागावांत जाऊन सेवा देणाऱ्या छोट्या बँकांनाही परवानगी देण्यात येत आहे. बिगर बँकिंग वित्तीय संस्थाही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे आर्थिक क्षेत्र विस्तार आहे, त्याचबरोबर यातील स्पर्धात्मकताही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, व्यवसायवृद्धी करताना बँकांनी, वित्तीय संस्थांनी ‘ग्राहक हाच राजा’ हे तत्त्व बाळगून ग्राहकांना सेवा देणे गरजेचे आहे.