Premium|Indian Banks Profitability Outlook FY2027 : कर्जवाटपात १९ टक्के वाढ, तरी बँकांचा नफा का घटणार? जाणून घ्या कारणे

Bank Profitability and Credit Risk Outlook : आर्थिक वर्ष २०२७ मध्ये कर्जवाटपात वाढ अपेक्षित असतानाही बँकांच्या नफाक्षमतेवर दबाव येण्याची शक्यता आहे. नेट इंटरेस्ट मार्जिनमधील घट आणि कर्जाशी संबंधित खर्चातील वाढ यांचा बँकांच्या मालमत्तेवरील परताव्यावर परिणाम होऊ शकतो.
Indian Banks Profitability Outlook FY2027

Indian Banks Profitability Outlook FY2027

esakal

Updated on: 

उच्च लोन-टू-डिपॉझिट रेशो आणि अपेक्षित कर्जतोटा (ईसीएल) चौकटीची अंमलबजावणी यामुळेही बँकांसमोर नवी आव्हाने निर्माण होणार आहेत. दुसरीकडे, बिगर बँकिंग वित्तीय संस्था (एनबीएफसी) क्षेत्रात तारणरहित कर्ज, वाहन वित्तपुरवठा आणि निधी उभारणीतील अडचणींमुळे मालमत्तेच्या गुणवत्तेला अधिक महत्त्व प्राप्त होऊ शकते. या पार्श्वभूमीवर, फिच ग्रुप ऑफ कंपनीजचा एक भाग असलेल्या इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्चचे संचालक आणि वित्तीय संस्था संशोधनप्रमुख करण गुप्ता यांची ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार वसंत कुलकर्णी यांनी खास ‘सकाळ मनी’साठी घेतलेली ही मुलाखत...

प्रश्न : इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्चच्या अर्धवार्षिक पतविषयक अहवालानुसार, कर्जवाटपात वाढ होऊनही आर्थिक वर्ष २०२७ मध्ये बँकांच्या नफाक्षमतेत घट होण्याची शक्यता का आहे?

गुप्ता : याची दोन मुख्य कारणे आहेत. कर्जवाटपातील वाढ वार्षिक आधारावर सुमारे १९ टक्के अपेक्षित असली, तरी या क्षेत्राची नफाक्षमता कमी होईल, असे आम्हाला वाटते. पहिले कारण म्हणजे, सध्याच्या व्याजदरचक्राचा विचार करता बँकांच्या ‘नेट इंटरेस्ट मार्जिन’मध्ये (एनआयएम) घट होण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दर (धोरणात्मक व्याजदर) वाढवला, तर परिस्थिती वेगळी असू शकते. कारण त्यामुळे कर्जांचे दर नव्याने निश्चित होतील आणि ठेवींवर द्यावे लागणारे व्याजदरही वाढतील. दुसरे कारण म्हणजे, वार्षिक आधारावर ‘क्रेडिट कॉस्ट’मध्ये (कर्जाशी संबंधित खर्च) काही प्रमाणात वाढ होण्याची अपेक्षा आहे. या दोन्ही घटकांचा एकत्रित परिणाम बँकांच्या ‘आरओए’वर (रिटर्न ऑन ॲसेट्स- मालमत्तेवरील परतावा) होऊन परिणामी नफाक्षमतेवर दबाव येऊ शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com