
JP Morgan & Bloomberg Index: India’s Entry into Global Bond Market
विशाखा बाग
gauribag7@gmail.com
भारतीय कर्जरोख्यांचा बाजार आता २२६ लाख कोटी रुपयांपर्यंत येऊन पोहोचला आहे. आतापर्यंत ६२ हजार ४३१ कोटी रुपये परकी गुंतवणूकदारांनी भारतीय कर्जरोख्यांमध्ये गुंतवले आहेत. मागील दहा वर्षांत कर्जरोखे बाजारात भारताने आमूलाग्र प्रगती केली आहे. तरीही भारतीय सर्वसामान्य गुंतवणूकदारांची खासगी कर्जरोख्यांमधील गुंतवणूक अत्यंत कमी आहे. सरकारी कर्जरोख्यांबरोबरच खासगी कंपन्यांच्या कर्जरोख्यांमध्येसुद्धा सर्वसामान्य गुंतवणूकदार मागेच आहे.