

Key Economic Factors Influencing Currency Value
sakal
प्रसाद भागवत (आर्थिक घडामोडींचे अभ्यासक-विश्लेषक)
अर्थभान
आपल्याकडे ‘रुपयाची घसरण’ हा कायमच सार्वजनिक चर्चेचा एक लोकप्रिय मुद्दा राहिला आहे. ऐंशीच्या दशकात गंगाधर गाडगीळ यांच्या अर्थकथांमधील जोडपे बंडू आणि स्नेहलता हेही रुपयाच्या कोसळण्याने गांगरून गेले होते, यावरूनच हे दुखणे किती जुनाट आहे हे लक्षात येईल.