
दिवाळी ते गणेशोत्सव : सणांचा अर्थव्यवस्थेवर प्रभाव
ई सकाळ
वीरेंद्र तळेगावकर
talegaonkarvirendra@gmail.com
भारतीय सण आणि देशाची अर्थव्यवस्था व्हाया कंझम्प्शन (ग्राहक क्रयशक्ती) हे एक अतूट नाते आहे. ऑगस्टच्या रक्षाबंधनापासून सुरू झालेला भारतीय सणांचा मोसम पुढच्या महिन्यात येणाऱ्या दिवाळीपर्यंत ‘पीक लेव्हल’ला असेल. गुढीपाडव्यानंतर पावसाळ्यापर्यंत तो पुन्हा वरच्या टप्प्यावर असेल. या देशातील सणांच्या रेलचेलमुळे अर्थव्यवस्थेची गती वाढण्यासही हातभार लागतो. रोजगाराच्या हालचालीचाही हातभार लागतो. शिवाय सण-समारंभाशी निगडित विविध क्षेत्रांची वर्दळही वाढते. भारतीय सण-उत्सव हे समाजाला जोडणारे, संस्कृती जपणारे आणि अर्थव्यवस्थेला बळ देणारे असे त्रिवेणी संगम आहेत.