
‘विद्यारंभ’ : अमेरिकेत भारतीय संस्कार देणारी सुजाता
ई सकाळ
सुधीर जोगळेकर
sumajo51@gmail.com
सुजाता या भारतीय महिलेने अमेरिकेत सुरू केलेल्या ‘विद्यारंभ’ला यंदाच्या २० ऑगस्टला सहा वर्षे पूर्ण झाली. एका उपनगरात चार विद्यार्थ्यांनिशी सुरू झालेलं ‘विद्यारंभ’ आता वाढत-वाढत तीन उपनगरांत आणि तीनशेहून अधिक मुलांना सामावत एक भारतीय सांस्कृतिक चळवळ बनू लागलं आहे.
भारतात असताना खूप पाळणाघरं पाहिली होती, एखाद-दुसऱ्यात माझ्या मुलींनाही ठेवण्याची वेळ आली होती. नोकरी करणाऱ्या पालकांची गरज म्हणून सुरू झालेली ती पाळणाघरं मुलाला प्राथमिक शाळेत किंवा माँटेसरीत घालण्यापूर्वीच्या अक्षर-ओळखीसाठी किंवा मूल चारचौघात रहावं, वावरावं म्हणून सुरू झालेली होती.
त्या पाळणाघरांना तेव्हा नियम, कायदे वा संकेत होते की नाही, याची गरजच कधी कुणाला वाटली नव्हती. कारण पाळणाघर चालवणारी महिला ओळखीची असे. अमेरिकेत येणं झालं आणि नातींना ठेवण्यासाठी म्हणून लावलेली पाळणाघरं किंवा प्री-स्कूल पाहिली, तेव्हा त्यातली व्यावसायिकता पाहून आश्चर्य वाटलं. अमेरिकेत एका भारतीय महिलेने सुरू केलेल्या पाळणाघराचा हा परिचय...