
मुंबई : जागतिक बाजारातील नकारात्मकता आणि परकी संस्थात्मक गुंतवणुकदारांनी केलेल्या नफावसुलीमुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात ‘भूकंप’ आला. सुमारे दीड टक्क्यांनी घसरण नोंदवीत दिवसअखेर सेन्सेक्स १,०४८.९० अंशांनी घसरून ७६,३३०.०१ अंशांवर, तर निफ्टी ३४४.५५ अंशांनी कोसळत २३,०८५.९५ अंशांवर बंद झाला.