
कौस्तुभ केळकर - आर्थिक घडामोडींचे अभ्यासक
गेल्या काही महिन्यांपासून भारतीय शेअर बाजारांत विविध कारणांमुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार विक्री करत आहेत. ऑक्टोबर २०२४ पासून या गुंतवणूकदारांनी सुमारे तीन लाख कोटी रुपयांचे शेअर विकले आहेत. हा विक्रीचा मारा झेलून आपल्या देशातील म्युच्युअल फंड, संस्थात्मक गुंतवणूकदार; तसेच किरकोळ गुंतवणूकदार खरेदी करत आहेत. परंतु, राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निर्देशांक ‘निफ्टी’ सुमारे २६ हजारांच्या पातळीवरून २२ हजार १२५ अंशांवर घसरला आहे.