Premium| share Market Trends : शेअर बाजारातील महत्त्वाचे कल
अमर देव सिंग
शेअर बाजारातील आकडे वरखाली होत असतात. मात्र शेअर बाजाराचा कल काही गोष्टींवर अवलंबून असतो. त्या गोष्टी कोणत्या आणि त्यांचा बाजारावर नेमका कसा परिणाम होतो, वाचा..
१. ट्रम्प आणि टेरिफ (टी अँड टी)
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयातशुल्क अर्थात टेरिफ धोरणाने जागतिक भांडवली बाजारपेठांमधील अस्थिरता वाढवली असून, त्यामुळे जगभरातील गुंतवणूकदारांसाठी अनिश्चिततेचे वातावरण तयार झाले आहे. व्यापारयुद्धामुळे विशेषतः अमेरिकेसारख्या सत्तेचे केंद्र असलेल्या देशाच्या आघाडीमुळे कायमच जागतिक आर्थिक मंदीचा धोका तीव्र होतो. भारतावर लागू करण्यात आलेले आयातशुल्क आशियातील इतर देशांच्या तुलनेत बरेच कमी असल्यामुळे भारताची परिस्थिती चांगली आहे. दरम्यान, अमेरिकेने चीन सोडून बहुतेक देशांसाठी ९० दिवसांचा पॉज जाहीर केला आहे. भारतासह इतर जागतिक अर्थव्यवस्थांना यामुळे दिलासा मिळाला असला, तरी कोणतेही प्रतिकूल बदल झाल्यास बाजारपेठेत तणाव तयार होऊ शकतो. दरम्यान, अमेरिका आणि चीनने एकमेकांवर लागू केलेल्या ‘टेरिफ’मुळे भारतातून अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीचा टक्का वाढू शकतो. मात्र, त्यातून अमेरिकी बाजारपेठेत स्वीकारार्ह नसलेली चिनी उत्पादने भारतावर लादली जाण्याची समस्या तयार होऊ शकते. म्हणूनच याबद्दल कोणत्याही घडामोडी भारतीय बाजारपेठांसाठी अडचणीच्या ठरू शकतात.