

India’s Hidden Treasure: Bihar Discovers Rare Minerals More Valuable Than Gold
eSakal
Bihar Rare Earth Mineral Discovery: भारतामध्ये सोन्याला केवळ धातू म्हणून नाही, तर परंपरा, पूजा आणि लग्नसमारंभांशी जोडलेले आहे. त्यामुळे सोनं म्हटलं की एक महाग आणि मौल्यवान धातू. मात्र आता बिहारमध्ये असा खनिजसाठा सापडला आहे, ज्याची किंमत आणि महत्त्व अनेक बाबतीत सोन्यापेक्षाही जास्त मानले जाते. बिहारमध्ये दुर्मिळ खनिज घटक म्हणजेच ‘रेअर अर्थ एलिमेंट्सचे मोठे साठे आढळल्याने देशभरात याची चर्चा सुरू झाली आहे.