

Indus Towers: India’s Leading Telecom Tower Infrastructure Provider
sakal
मकरंद विपट (‘सेबी’ रजिस्टर्ड रिसर्च अॅनालिस्ट)
उत्तम गुंतवणूक
इंडस टॉवर्स लि. ही कंपनी वायरलेस कम्युनिकेशन टॉवरची स्थापना, संचालन आणि देखभाल या व्यवसायात गुंतलेली आहे. ती टॉवर आणि संबंधित पायाभूत सुविधा शेअरिंग सेवा पुरवते. ही देशातील सर्वांत मोठ्या टेलिकॉम टॉवर कंपन्यांपैकी एक आहे. ती दीर्घकालीन करारांतर्गत सामाईक आधारावर, प्रामुख्याने वायरलेस टेलिकम्युनिकेशन सेवा प्रदात्यांना, तिच्या टॉवरमध्ये प्रवेश प्रदान करते. या कंपनीच्या शेअरने गेल्या शुक्रवारी तांत्रिक विश्लेषणाच्या दैनिक तक्त्यावर एक पॅटर्न तयार केला आहे. सोबत दिलेला तांत्रिक विश्लेषणाचा आलेख पाहिल्यास त्याची दैनंदिन पातळीवरील हालचाल लक्षात येईल.