
किरांग गांधी
kirang.gandhi@gmail.com
श्रीमंत किंवा कोट्यधीश होण्याचं स्वप्न भारतीय मानसिकतेत दशकानुदशकं खोलवर रुजलेलं आहे. हे स्वप्न आर्थिक स्वातंत्र्याचं, स्थैर्याचं आणि यशाचं प्रतीक मानलं जातं. अनेक कुटुंबांनी या स्वप्नाचा ध्यास घेतला; तसेच पालकांनी हे आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आदर्श असल्याचे मानलं; पण २०२५ चं वास्तव वेगळंच आहे. आजच्या घडीला या ‘एक कोटी रुपयाचे’ मूल्य आता पूर्वीइतके राहिलेले नाही. महागाईच्या घातक प्रभावामुळे, एक कोटी रुपयांचे मूल्य २५ लाख रुपयांपर्यंत घसरले आहे. आजच्या काळात याची जाणीव असणे आवश्यक आहे.