Premium|Inflation Planning : खिशाला कात्री लावणाऱ्या महागाईवर कशी मात करावी? गुंतवणुकीचे आणि आर्थिक नियोजनाचे खास सूत्र

Understanding Inflation and Purchasing Power : वाढत्या महागाईमुळे पैशांची खरेदीशक्ती घटत असून, केवळ बचत न करता योग्य गुंतवणूक, आर्थिक शिस्त आणि ठोस नियोजनाच्या जोरावरच सर्वसामान्य माणूस आपले भविष्य सुरक्षित करून महागाईच्या या आव्हानावर प्रभावीपणे मात करू शकतो, असा मोलाचा सल्ला.
Understanding Inflation and Purchasing Power

Understanding Inflation and Purchasing Power

esakal

Updated on

दीपाली मुजुमदार - deepalimujumdar@gmail.com

महागाई थांबवता येत नाही; पण योग्य नियोजन, सातत्यपूर्ण गुंतवणूक आणि शिस्तबद्ध जीवनशैली यांच्या साह्याने तुम्ही तुमचे आर्थिक भविष्य सुरक्षित आणि मजबूत बनवू शकता. महागाई (इन्फ्लेशन) हा विषय दिसायला साधा वाटला, तरी तो तुमच्या साठवलेल्या पैशांचा सर्वांत मोठा शत्रू आहे. महागाई म्हणजे नेमके काय, तिचे प्रकार कोणते, महागाईवर मात करण्यासाठीचे ठोस उपाय कोणते, याबद्दल मार्गदर्शन करणारा हा लेख...

महागाईच्या लाटेत जीवन हेलकावतं,

कष्टांचं मोलही कमीच भासतं

स्वप्नं डोळ्यांत अजूनही उजळतात,

पण किमती त्यांना दूरच ठेवतात...

वसेंदिवस महागाई वाढत चालली आहे आणि सर्वसामान्य माणसाचे जगणे थोडे कठीण होत चालले आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे भाव वाढत आहेत; पण उत्पन्न मात्र तेवढेच आहे. आज प्रत्येक घरात एकच प्रश्न आहे ‘खर्च कसा भागवायचा?’ महागाई फक्त आकड्यांत नाही, ती आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षणात जाणवते. यावर योग्य नियोजन आणि ठोस उपाययोजना गरजेच्या आहेत; नाहीतर सर्वसामान्य माणसाचा संघर्ष आणखी वाढणार आहे. महागाई (इन्फ्लेशन) हा विषय दिसायला साधा वाटला, तरी तो तुमच्या साठवलेल्या पैशांचा सर्वांत मोठा शत्रू आहे. तो तुमची संपत्ती हळूहळू संपवतोय! समजा, आज तुम्ही एक लाख रुपये रोख ठेवून दिले आणि दहा वर्षांनी ते एक लाखच राहतील का? आकडा कदाचित तोच असेल; पण त्या पैशांची ‘खरेदी करण्याची ताकद’ (पर्चेसिंग पॉवर) मात्र, निम्मी झालेली असेल. यालाच अर्थशास्त्राच्या भाषेत ‘इन्फ्लेशन’ किंवा ‘महागाई’ असे म्हणतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com