

France Penalises Infosys Over Employee Work Hours; Here's What Happened
esakal
Narayan Murthy: भारतातील आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी इन्फोसिसला फ्रान्समध्ये मोठा धक्का बसला आहे. फ्रान्समधील कामगार कायद्यांचे पालन न केल्याप्रकरणी कंपनीवर सुमारे 1.75 लाख युरो म्हणजेच 2 कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासांची नोंद ठेवण्यात चूक झाल्याचे आढळल्याने ही कारवाई करण्यात आली.
फ्रान्समधील प्रादेशिक कामगार प्राधिकरणाने Infosys कडून हा दंड आकारला आहे. शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत इन्फोसिसने दंडाबाबत अधिकृत सूचना मिळाल्याची पुष्टी केली असून, कंपनी सध्या या आदेशाचा अभ्यास करत असल्याचे सांगितले आहे.