

वसंत कुलकर्णी
vasant@vasantkulkarni.com
बडोदा बीएनपी परिबा म्युच्युअल फंडाचे वरिष्ठ निधी व्यवस्थापक शिव चनानी यांना एकूण २४ वर्षांचा अनुभव आहे. बडोदा बीएनपी परिबा म्युच्युअल फंडात दाखल होण्यापूर्वी ते एलारा सिक्युरिटीज (इंडिया) प्रा. लि.मध्ये इक्विटी रिसर्च अँड स्ट्रॅटेजी प्रमुख म्हणून कार्यरत होते.
त्यापूर्वी त्यांनी ई-फंड मॅनेजमेंट (एचके) कंपनी, सुंदरम ॲसेट मॅनेजमेंट कंपनी आणि निप्पॉन लाईफ इंडिया ॲसेट मॅनेजमेंटमध्ये विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, बंगळूरमधून त्यांनी ‘पीजीडीएम’ पूर्ण केले असून, ते अमेरिकेच्या सीएफए इन्स्टिट्यूटचे पात्रताधारक आहेत. त्यांच्याशी ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार वसंत कुलकर्णी यांनी साधलेला संवाद...