
"Cheque clearing process becomes faster with RBI’s new digital banking initiative."
Sakal
-सुधाकर कुलकर्णी, सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर-सीएफपी
बँकेत चेक (धनादेश) भरल्यानंतर तो आपल्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया अधिक जलद होण्यासाठी नवी अधिक वेगवान ‘सीटीएस’ क्लिअरिंग अर्थात कन्टिन्युअस क्लिअरिंग पद्धत दोन टप्प्यात सुरू होणार आहे. यातील पहिला टप्पा चार ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. पहिल्या टप्प्यात चार ऑक्टोबर २०२५ ते दोन जानेवारी २०२६ पर्यंत आपण बँकेत भरलेला चेक त्वरित स्कॅन करून क्लिअरिंगसाठी पाठविला जाईल.