Premium|Instant Digital Loan : डिजिटल सावकारीचा नवा सापळा; झटपट कर्जामुळे आर्थिक स्वातंत्र्य धोक्यात

The Trap of Instant Digital Loans : क्षणात कर्ज देणाऱ्या डिजिटल ॲप्समुळे आर्थिक अडचणीत सापडलेले तरुण आणि मध्यमवर्गीय लोन स्टॅकिंगच्या चक्रात अडकत आहेत; छुपे शुल्क आणि अवाजवी व्याजदर संकट अधिक गंभीर करत आहेत.
Instant Digital Loan

Instant Digital Loan

esakal

Updated on

ट्युइश अग्रवाल - tyuish@gmail.com

​अवघ्या काही मिनिटांत मिळणाऱ्या डिजिटल ॲप-आधारित कर्जांच्या जाळ्यात आज लाखो तरुण व मध्यमवर्गीय अडकले आहेत. पारदर्शकतेचा अभाव, छुपे शुल्क आणि दिवसाला एक टक्का (वार्षिक ३६५ टक्के) असणारा प्रचंड व्याजदर यामुळे ही ‘इन्स्टंट डिजिटल लोन’ आर्थिक परावलंबित्वाचे कारण ठरत आहेत. एकाच वेळी अनेक ॲपवरून कर्जे घेण्याच्या (लोन स्टॅकिंग) या चक्रव्यूहातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी व्याजदरांवर कायदेशीर मर्यादा आणि एकाच वेळी घेता येणाऱ्या कर्जांच्या संख्येवर निर्बंध घालणे गरजेचे बनले आहे. ‘डिजिटल सावकारी’च्या या नव्या जोखडातून आर्थिक स्वातंत्र्याकडे नेणारा ‘मनीलाइफ फाउंडेशन’च्या संशोधनावर आधारित विशेष लेख.

रारात्री ११ वाजून ४७ मिनिटे...

मोबाईलचा स्क्रीन उजळला...

‘Congratulations! 75,000

Pre-approved. Money in just 3 Minutes.’

अमोलने (नाव बदलले आहे) एक क्षणही विचार केला नाही. दोन दिवसांपासून तो झोपू शकला नव्हता.

मुलाच्या शाळेची फी...

घराचा हप्ता...

क्रेडिट कार्डची देय तारीख...

आणि पगार यायला अजून चार दिवस बाकी.

त्याने क्लिक केले.

आधार...

पॅन....

सेल्फी...

ओटीपी...

सगळे सोपस्कार झाले आणि अवघ्या तीन मिनिटांत पैसे खात्यात आले.

त्या क्षणी त्याला वाटलं...

‘‘मी संकटातून बाहेर पडलो.’’

पण खरं तर... तो एका नव्या संकटात प्रवेश करत होता.

सहा महिन्यांनी त्याच्याकडे सात लोन ॲप होती.

एका ॲपचा EMI भरण्यासाठी दुसऱ्या ॲपमधून कर्ज... दुसऱ्याचा हप्ता भरण्यासाठी तिसरे... असे चक्र सुरू झाले.

मोबाईलमध्ये बँकेचे एक ॲप होतेच... शिवाय सात लोन ॲप.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com