

Insurance Goes Smart! How Technology is Making Policies Easier Than Ever
eSakal
लेखक: अत्री चक्रबर्ती, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, इंडियाफर्स्ट लाइफ इन्शुरन्स
आज प्रामुख्याने डिजिटल क्षेत्रातील गतीशील बदलांच्या चालनेमुळे भारतातील आयुर्विमा क्षेत्र लक्षणीय बदलांतून जात आहेत. पारंपरिकरित्या जटिल समजल्या जाणाऱ्या आयुर्विमा उत्पादनांमध्ये आता डिजिटल क्रांतीमुळे मोठा बदल होत आहे. आज तंत्रज्ञानामुळे ही उत्पादने सुलभ, अधिक पारदर्शक आणि ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहेत.
पूर्वी आयुर्विमा घेण्यासाठी एजंटची भेट किंवा वारंवार फोनकॉल करावे लागत होते. मात्र आता तंत्रज्ञानामुळे हा संपूर्ण प्रवास स्मार्टफोन अॅपमध्ये आला आहे. सोप्या इंटरफेसमुळे काही मिनिटांत कोट मिळतो, प्रस्ताव प्रक्रिया आणि अंडररायटिंग जलद होते, त्यामुळे प्रत्यक्ष भेटीशिवायही पॉलिसी जारी होते.