

Intangible Assets: The New Engine of India’s Economic Growth
E sakal
IMF & WIPO Reports: How Intangible Investments Are Driving Productivity
प्रा. गणेश हिंगमिरे
ganesh.hingmire@gmail.com
सर्वसामान्यांना परिचित असलेली संपत्ती म्हणजे मूर्त किंवा भौतिक किंवा स्थूल स्वरूपातील संपत्ती, जसे जमीन किंवा वस्तू आदी. या संपत्तीला स्थावर किंवा जंगम मालमत्ता असेही संबोधले जाते. पूर्वी मूर्त संपत्तीमधील गुंतवणुकीचा परतावा मोठ्या प्रमाणात असायचा. त्यामुळे बहुतांश लोक यात गुंतवणूक करत असत; पण आता मूर्त स्वरूपातील संपत्तीच्या परताव्याला मर्यादा निर्माण झाल्या असल्याने अमूर्त संपत्तीतील गुंतवणुकीला प्राधान्य मिळाले आहे आणि भारत अमूर्त संपत्तीतील गुंतवणुकीमध्ये अग्रेसर झाल्याचा नुकताच अहवाल जिनिव्हा येथील जागतिक बौद्धिक संपदा संस्थेने जाहीर केला आहे.