
शिरीष देशपांडे
सरकारने नुकतीच क्विक रिस्पॉन्स कोड म्हणजेच क्यूआर कोड असलेल्या पॅनकार्ड २.० ची घोषणा केली आहे. या पॅनकार्डमध्ये मॅट्रिक्स बारकोड असणार आहे, त्यामुळे पॅनकार्डचा वापर अधिक सुरक्षित होणार आहे. बनावट पॅनकार्ड बनवणे चोरट्यांना शक्य होणार नाही. बँका, आर्थिक संस्था आणि सरकारी कामासाठी पॅनकार्डची पडताळणी सुलभ होणार आहे. याबाबत सर्वसामान्य नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत, या परिस्थितीचा फायदा घेत सायबर चोरट्यांनी नव्या पॅनकार्डबाबत संभ्रम निर्माण करणारे फोन, एसएमएस, लिंक, ई-मेल करून फसवणूक करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे सर्वांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.