
देवदत्त तांबे - म्युच्युअल फंड वितरक
आपण फोन किंवा कार खरेदी करताना उच्च गुणवत्तेला प्राधान्य देतो. कारण या गोष्टी नियमित वापरात किंवा आदर्श परिस्थितीतच नव्हे, तर कठीण परिस्थितीतही विश्वासार्ह असाव्यात, अशी आपली अपेक्षा असते. त्याचप्रमाणे, गुंतवणूक करताना, उच्च गुणवत्तेच्या व्यवसायांकडून चांगल्या काळात स्थिर परतावा मिळण्याची; तसेच बाजारातील तणावाच्या काळातही चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा असते. यासाठी कमी अस्थिरता, उच्च आणि जोखीम समायोजित परतावा असलेली गुणवत्तापूर्ण व्यवसायक्षेत्रे ओळखणे महत्त्वाचे असते. साधारणपणे उत्पादन, सेवा, वितरण किंवा ब्रँड क्षेत्रातील उत्कृष्टता; तसेच भांडवलावरील उच्च परतावा देणारे, रोख राखीव निधीचे उच्च प्रमाण आणि चांगले भांडवल वाटप असलेले व्यवसाय उच्च गुणवत्तापूर्ण असतात.