Premium|Overseas Investment Options for Indians : जागतिक कंपन्यांमध्ये पैसे गुंतवण्याची सुवर्णसंधी; मंदीच्या काळातही तुमच्या पैशाला 'ग्लोबल फंडा'चा मोठा आधार

International Mutual Funds Investment Guide : जागतिक स्तरावर तंत्रज्ञान आणि उद्योग वेगाने बदलत असताना गुंतवणूक फक्त भारतापुरती मर्यादित ठेवणे पुरेसे नाही. पोर्टफोलिओ संतुलित करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये गुंतवणुकीची संधी मिळवण्यासाठी 'ग्लोबल फंड' हा एक उत्तम पर्याय ठरत आहे.
Overseas Investment Options for Indians

Overseas Investment Options for Indians

esakal

Updated on

अथर्व जोशी - ajoshi0448@gmail.com

आजच्या जागतिकीकरणाच्या युगात गुंतवणूक केवळ भारतापुरती मर्यादित ठेवणे हे दीर्घकालीन दृष्टीने अपुरे ठरू शकते. जगभरातील अर्थव्यवस्था, उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्र झपाट्याने विकसित होत असताना गुंतवणूकदारांसाठी संधीही जागतिक पातळीवर उपलब्ध होत आहेत. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंड (ग्लोबल/इंटरनॅशनल) गुंतवणूकदारांना त्यांचा पोर्टफोलिओ अधिक सक्षम आणि संतुलित बनवण्याचा एक प्रभावी मार्ग ठरतात. ही गुंतवणूक कोणी, का आणि कशी करावी, याबद्दल माहिती देणारा हा लेख...

आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंड म्हणजे भारताबाहेरील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणारे फंड. हे फंड अमेरिकेसारख्या विकसित बाजारपेठांपासून ते चीन, तैवान, ब्राझीलसारख्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांपर्यंत विविध ठिकाणी गुंतवणूक करतात. काही फंड पूर्णपणे परदेशात गुंतवणूक करतात (इंटरनॅशनल फंड). काही फंड भारत आणि परदेश अशा दोन्हींकडे गुंतवणूक करतात (ग्लोबल फंड).

आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे विविधता अर्थात डायव्हर्सिफिकेशन. एखाद्या गुंतवणूकदाराने फक्त भारतीय बाजारात गुंतवणूक केली असेल, तर त्या पोर्टफोलिओवर भारतातील आर्थिक परिस्थिती, धोरणे किंवा महागाईचा थेट परिणाम होतो. परंतु, जागतिक स्तरावर गुंतवणूक केल्यास एका देशातील मंदीचा परिणाम दुसऱ्या देशातील वाढीमुळे संतुलित होऊ शकतो. त्यामुळे एकूण पोर्टफोलिओ अधिक स्थिर राहतो. याशिवाय, जागतिक स्तरावर अशा अनेक मोठ्या आणि नावीन्यपूर्ण कंपन्या आहेत, ज्या भारतात सूचीबद्ध नाहीत, विशेषतः तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), इलेक्ट्रिक वाहने (ईव्ही) आणि सेमी कंडक्टरसारख्या क्षेत्रांमधील त्या कंपन्या असतात, अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी आंतरराष्ट्रीय फंडामुळे मिळते. त्यामुळे उच्च वाढीच्या संधींचा लाभ घेता येतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com