
राजेंद्र केळकर - संचालक, केळकर इन्व्हेस्टमेंट्स
एखादा खेळाडू ‘फॉर्मात’ आहे किंवा ‘आउट ऑफ फॉर्म’ आहे, असे क्रिकेट विश्वात आपण अनेकदा ऐकत असतो. जो खेळाडू चांगली कामगिरी करत असतो तो ‘फॉर्म’मध्ये असतो. साहजिकच संघाच्या विजयाची शक्यता वाढविण्यासाठी या खेळाडूची अंतिम अकरा खेळाडूंमध्ये निवड केली जाते. ज्यांची कामगिरी चांगली होत नाही त्यांना सामान्यतः फॉर्म परत येईपर्यंत विश्रांती देण्यात येते. गुंतवणुकीतही ‘मोमेंटम इन्व्हेस्टमेंट’मध्ये हेच तत्त्व अनुसरले जाते. त्यात चांगली कामगिरी करणाऱ्या किंवा ‘फॉर्म’मध्ये असलेल्या शेअरची निवड करण्यात येते आणि सुस्तावलेल्या शेअरना वगळण्यात येते.