
डॉ. वीरेंद्र ताटके - गुंतवणूक विषयाचे अभ्यासक
चष्मे मुख्यत्वेकरून दोन प्रकारचे असतात. एक जवळचा चष्मा आणि एक दूरचा चष्मा! जवळचे स्पष्ट दिसण्यासाठी जो चष्मा वापरला जातो, तो चुकून दूरचे पाहण्यासाठी वापरला, तर डोळ्यांवर ताण येतो, डोकं दुखते आणि ज्यासाठी चष्मा वापरला जातो तो उद्देश साध्य होत नाही. कारण असा चष्मा वापरून दूरचे चित्र धूसर आणि चुकीचे दिसते. कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीची कामगिरी पाहण्यासाठी दूरचा चष्मा वापरायला हवा. विशेषतः शेअर बाजार, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक तर दूरच्या चष्म्यातूनच पाहिली पाहिजे. ती जवळच्या चष्म्यातून पाहिली, तर कदाचित भीतीदायक चित्र दिसू शकते.