शेअर बाजार : इंटरनॅशनल जेमॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (शुक्रवारचा बंद भाव : रु. ३६०)

कृत्रिम हिरे प्रमाणनात जागतिक आघाडी, मजबूत आर्थिक कामगिरी आणि कमी कर्जामुळे ‘आयजीआयएल’ गुंतवणुकीसाठी आकर्षक पर्याय मानला जातो
Investment analysis of International Gemological Institute (India) Ltd by Bhushan Oak

Investment analysis of International Gemological Institute (India) Ltd by Bhushan Oak

Sakal

Updated on

भूषण ओक, शेअर बाजार विश्‍लेषक

जागतिक हिरे आणि दागिन्यांच्या बाजारपेठेत भारत एक प्रमुख केंद्र आहे. या उद्योगात विश्वासार्हता आणि पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी रत्न प्रमाणन (सर्टिफिकेशन) आणि प्रतवारी सेवा अत्यंत महत्त्वाच्या असतात. इंटरनॅशनल जेमॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (इंडिया) लि. अर्थात ‘आयजीआयएल’ ही या क्षेत्रातील भारतातील सर्वांत मोठी आणि जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकाची अग्रगण्य कंपनी आहे. भारतातील हिरे प्रमाणन बाजारपेठेत या कंपनीचा वाटा सुमारे ५० टक्के आहे. हिरे व्यापारात जागतिक केंद्र असलेल्या बेल्जियममधील अँटवर्प येथे ‘आयजीआयएल’ची स्थापना १९७५ मध्ये झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com