
अलिकडे मुलीदेखील मुलांच्या बरोबरीने शिक्षणासोबतच सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. यासाठीच प्रत्येक पालकाला Parents देखील आपल्या मुलीने देखील चांगलं शिक्षण घ्यावं आणि करियर करावं अशी इच्छा असते. Know About Government schemes to secure life of your daughter
तर काही पालकांना मुलीला शिकवून Education चांगलं मोठं करून त्यानंतर तिचं लग्न चांगलं धुमधडाक्यात व्हावं अशी इच्छा असते. यासाठी मुलीच्या जन्मापासूनच अनेक पालक बचत करण्यास आणि तिच्या भविष्यासाठी पैसा साचवण्यास Savings सुरुवात करतात.
जर तुम्हालाही तुमच्या मुलीच्या भविष्याची चिंता असेल तसंच तिच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी मोठं सेव्हिंग करायचं असेल तर तुम्ही काही सरकारी योजनांचा लाभ नक्की घेऊ शकता.
सरकारने खास करून मुलींच्या शिक्षणासाठी तसचं मुलींसाठी विविध बचत योजना सुरु केल्या आहेत. या योजनांचा योग्य प्रकारे लाभ घेतल्यास तुमची मुलीच्या भविष्याची चिंता मिटेल. अशाच काही योजना आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
सुकन्या समृद्धी योजना
सुकन्या समृद्धी योजना ही मुलींच्या भविष्यासाठी बचत करण्यासाठी एक उत्तम योजना आहे. ही एक स्मॉल सेव्हिंग स्किम आहे. मुलीच्या जन्मानंतर १० वर्षांसाठी तुम्ही या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता. या योजनेत तुम्ही वर्षाला केवळ २५० रुपये देखील भरू शकता तर जास्तीत जास्त तुम्ही या योजनेत वर्षाला १.५ लाख जमा करू शकता.
मुलगी १८ वर्षांची होईपर्यंतही तुम्ही यात गुंतवणूक करू शकता. या योजनेत सध्याच्या घडीला सरकार ७.६ टक्के इतका व्याजजर देत आहे. यामुळे मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत तुम्ही चांगली बचत करू शकता. कोणत्याही सरकारी बँकेत किंवा पोस्टात तुम्ही ही योजना सुरू करू शकता.
हे देखिल वाचा-
बालिका समृद्धी योजना
सुकन्या समृद्धी योजनेप्रमाणेच काहीशी समान ही योजना आहे. अल्प उत्पन्न असेल्या कुटुंबियातील मुलीच्या भविष्यासाठी सरकारकडून ही योजना राबवली जाते. या योजनेमध्ये मुलीच्या जन्मावेळी तिच्या आईला ५०० रुपयांची सबसिडी दिली जाते.
त्याचप्रमाणे शिक्षण घेणाऱ्या मुलींना ३०० रुपयांपासून १००० रुपयांपर्यंतची स्कॉलरशीप दिली जाते. ही स्कॉलरशीप पोस्ट खात्यात जमा होते. मुलीचं वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर उर्वरित रकमेतून पैसे काढता येतात.
माझी कन्या भाग्यश्री योजना
महाराष्ट्र सरकारकडून ही खास योजना राबवली जाते. महिला शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी २०१६ सालामध्ये महाराष्ट्र सरकारकडून ही योजना राबवण्यास सुरुवात झाली. या योजनेत तर मुलीच्या जन्मानंतर जर पालकांनी नसबंदी केली तर मुलीच्या नावाने ५० हजार रुपये जमा करण्यात येतात.
तर दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन केलं तर दोन्ही मुलीच्या नावे २५-२५ हजार रुपये जमा करण्यात येतात. या योजनेत कोणतही व्याज दिलं जात नसून मुलगी १८ वर्षांची झाल्यावर तिला पूर्ण रक्कम दिली जाते.
लेक लाडकी योजना
आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबियातील मुलींना शिक्षण घेता यावं, त्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी महाराष्ट्र सरकारनं ही योजना सुरू केली आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाने ही योजना जाहीर केली आहे. या योजनेत मुलीच्या जन्मापासून ती १८ वर्षांची होईपर्यंत सरकार टप्प्यांमध्ये आर्थिक मदत करेल.
या योजनेमध्ये मुलीच्या जन्मानंतर ५ हजार रुपयांची मदत दिली जाईल. तर ती पहिल्या वर्गात गेल्यावर शासनाकडून ४ हजार रुपये दिले जातील. सहावीत गेल्यावर ६ हजार आणि अकरावीत ८ हजार दिले जातील. तर मुलगी १८ वर्षांची झाल्यावर ७५ हजार रुपये दिले जातील.
हे देखिल वाचा-
CBSE उडान योजना
मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून ही योजना राबवण्यात येते. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या या योजनेत इंजिनिअरिंग आणि टेक्निकल कॉलेजमध्ये मुलींची संख्या वाढण्याच्या उद्देशांने मुलींना मदत केली जाते.
१० वी मध्ये किमान ७० टक्के तसंच गणित आणि विज्ञान विषयात किमान ८० टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थीनी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेमध्ये मुलींना ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षणाच्या सर्व सुविधा पुरवल्या जातात. Engineering Entrance परीक्षा देता यावी यासाठी आवश्यक ते शिक्षण साहित्य आणि प्रि लोडेड टॅब दिला जातो.
याशिवाय प्रत्येक राज्यांमध्ये तिथल्या राज्य सरकारकडून मुलींच्या शिक्षणासाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात. या योजनांचा लाभ घेऊन तुम्ही मुलींच्या शिक्षणावरील खर्च वाचवू शकता. शिवाय त्यांना उच्च शिक्षण देऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.