Investment Tips: योग्य Investment करायचीये? मग सोने खरेदी की स्टॉक मार्केट, कोणता पर्याय फायदेशीर?

Gold investment vs stock market : गेल्या १०-१५ वर्षातील चित्र पाहता. सोन्याच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामागे जागतिक घडामोडी हे देखील एक कारण आहे. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक केलेल्यांना तोटा सहन करावा लागलेला नाही
Investment Tips - gold investment vs stock market
Investment Tips - gold investment vs stock market Esakal

Investment Tips: कोणतीही व्यक्ती पैशांची गुंतवणूक Investment करत असताना त्याला जास्त फायदा कुठून मिळेल हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते.

जिथे सर्वात जास्त रिटर्न मिळत असतील शिवाय गुंतवणूकीची जोखिमही Investment Risk कमी असेल अशा ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी अनेकजण प्राधान्य देतात. Which Investment is beneficial stock market or gold silver

अर्थात गुंतवणूक करत असताना तुम्ही ती किती करत आहात तसंच किती काळासाठी करत आहात आणि कुठे करत आहात, यावर तुम्हाला मिळणारे रिटर्न ठरत असतात. गुंतवणुकीसाठी Investment जास्त लोकप्रिय असलेले पर्याय म्हणजे स्टॉक मार्केट Share Market आणि सोने-चांदी खरेदी.

अर्थात इथे गुंतवणूक करत असतानाही नेमकी कुठे गुंतवणूक करणं योग्य असा प्रश्न अनेकांना पडतो. अर्थात दोन्ही गुंतवणूकीचे जसे फायदे आहेत तसे काही तोटे किंवा जोखिम देखील आहे.

शेअर मार्केट किंवा स्टॉक मार्केटमध्ये कायम उतार-चढाव पाहायला मिळतात. यावर देशातील किंवा ग्लोबल मार्केटचा परिणाम होत असतो. तर सोने किंवा चांदीची वस्तू हरवण्याची किंवा चोरी होण्याची चिंता असते. तसंच शेअर मार्केटमधील चढ-उताराचा सोने-चांदीच्या दरावर परिणाम होत असतो असा अनेकांचा समज आहे.

गेल्या काही वर्षातील रेकॉर्ड पाहता स्टॉक मार्केटहून अधिक रिटर्न हे सोन्यातील गुंतवणूकीतून Investment in Gold मिळाले आहेत. शेअर बाजारात तेजी आल्यास सोने आणि चांदीचे दर घसरतात असं म्हंटलं जातं. तर बाजार घसल्यास हे दर वाढतात.

मात्र गेल्या १०-१५ वर्षातील चित्र पाहता. सोन्याच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामागे जागतिक घडामोडी हे देखील एक कारण आहे. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक केलेल्यांना तोटा सहन करावा लागलेला नाही.

हे देखिल वाचा-

Investment Tips - gold investment vs stock market
Government Investment Scheme : शहाणे असाल तर सरकारच्या या स्किममध्येच पैसे गुंतवा, फायदाच फायदा होईल!

जवळपास १५ वर्षांपूर्वी सेंसेक्स २०२८५ वर होता. यावेळी १० ग्रॅम सोन्याची किंमत ही ९३९५ इतकी होती. तर चांदीची किंमत १९५२० रुपये किलो होते. तर आजच्या घडीला सेंसेक्स ६२,८८५ वर असून सोनेच्या भाव हा ६१, ४९० रुपये १० ग्रॅम आहे. तर चांदीचा दर हा ७०६५९ रुपये किलो इतका आहे.

कशातून मिळाला जास्त परतावा?

गेल्या १५ वर्षातील आकडेवारी पाहता सोन्यातून ४०० टक्के तर चांदीतून २०० टक्क्याहून अधिक परतावा मिळाला आहे. तर याच कालात सेंसेक्सने गुंतवणूकदारांना २०० टक्क्यांहून अधिक रिटर्न्स दिले आहेत.

एकंदरच सोन्यामध्य गुंतवणूक केलेल्यांना स्टॉक मार्केटमधील गुंतवणूकदारांपेक्षा अधिक परतावा मिळाला आहे. असं असलं तरी ज्यांनी मोठ्या काळासाठी सेंसेक्समध्ये गुंतवणूक केलीय त्यांना देखील चांगला फायदा मिळाला आहे.

कशात गुंतवणूक करणं योग्य

गेल्या काही वर्षातील आकडेवारी पाहता सेंसेक्स सोबतच सोने-चांदीच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक केलेल्यांना चांगला परतावा मिळाला आहे. यामुळे तुम्ही १५ वर्षातील आकडेवारी लक्षात घेऊन गुंतवणूक कुठे करावी याचा निर्णय घेऊ शकता.

अर्थात तुम्हाला दीर्घकाळात जास्त नफा हवा आहे की कमी काळात, तसंच जोखिम घेण्याची तयारी यावर तुम्ही कुठे गुंतवणूक करावी याचा निर्णय घेऊ शकता.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना कमी काळात जास्त नफा देणाऱ्या संस्थांच्या मोहात पडणं टाळावं. गुंतवणूक करताना अभ्यास करून गुंतवणूक करणं गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला सेंसेक्स किंवा स्टॉक मार्केटचा थोडा अभ्यास करणं गरजेचं आहे.

तर दुसरीकडे तुम्हाला जोखिम न घेता गुंतवणूक करायची असल्यास तुम्ही सोने-चांदीमध्ये करू शकता. दागिने खरेदी करणं म्हणजे सोन्यात गुंतवणूक करणं असा होत नाही.

सोन्यातील गुंतवणूक ही डिजीटल गोल्ड, सॉवरेन गोल्ड बॉन्ड तसचं गोल्ड म्युच्युअल फंड आणि गोल्ड ईटीएफच्या माध्यमातून केली जाते. या पर्यायांच्या माध्यमातून तुम्ही चांगला परतावा मिळण्यासाठी सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com