शेअर बाजाराला युद्धझळा! कच्चे तेल महागले, गॅसची टंचाई; रुपयाची घसरगुंडी, सोनं झालं स्वस्त

Iran Israel War Impact आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या झळा शेअर बाजाराला बसल्या आहेत. याशिवाय कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने अर्थकारणालाही फटका बसला आहे. सोने-चांदीच्या भावांमध्येही घसरण झाली आहे.
Middle East War Oil Prices Spike Rupee Weakens Gold and Silver Prices Fall

Middle East War Oil Prices Spike Rupee Weakens Gold and Silver Prices Fall

Esakal

Updated on

Middle East Conflict Hits Stock Market Rupee Falls and Oil Gets Costly आखातामधील युद्धामुळे निर्माण झालेला तणाव कायम असल्याने सोमवारी शेअर बाजारात पुन्हा मोठ्या प्रमाणावर विक्री झाली आणि निर्देशांक १.७५ टक्क्यांनी घसरले. सेन्सेक्स हा एक हजार ३५२.७४ अंशांनी, तर निफ्टी ४२२.४० अंशांनी घसरला. शेअर बाजारातील ही एकाच दिवसात झालेली सहावी मोठी घसरण आहे. पडझडीमुळे सर्व गुंतवणूकदारांच्या एकूण सर्व शेअरचे बाजारमूल्य आठ लाख कोटी रुपयांनी कमी होऊन ते ४४१ लाख कोटी रुपयांवर आले. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने अर्थकारणाला हा फटका बसला आहे. सोने-चांदीच्या भावांमध्येही घसरण झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com