इस्रायल इराण युद्धाचा थेट परिणाम, कच्च्या तेलाच्या दराचा भडका; पेट्रोल-डिझेल महाग होणार?

Israel Iran War impact on fuel price : इस्रायल इराण युद्धानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीतही मोठी वाढ झाली आहे. यामुळे नवं संकट निर्माण झालं आहे. इंधन तेलाच्या किंमतीचा भडका उडण्याची शक्यता आहे.
Crude Oil Prices Jump Amid Israel Iran War

Crude Oil Prices Jump Amid Israel Iran War

Esakal

Updated on

Global Markets React To Escalating Conflict आखाती देशांमध्ये भडकलेल्या युद्धाच्या आगीची झळ जगाला बसू लागली आहे. अमेरिका, इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. होर्मुझची सामुद्रधुनी ही महत्त्वाच्या जलमार्गापैकी एक आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्यानं जागतिक सागरी व्यापारावर प्रचंड परिणाम होण्याची शक्यता आहे. इस्रायल इराण युद्धानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीतही मोठी वाढ झाली आहे. यामुळे नवं संकट निर्माण झालं आहे. इराणने आखाती देशांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले आहेत. यात दुबई, अबुधाबीसह कतार, बहरीन, सौदी अरेबिया आणि ओमानचा समावेश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com