

Tax Filing Alert: Important Changes Made in ITR-4 Form
sakal
- प्रणव मंत्री, चार्टर्ड अकाउंटंट-सीए
करअनुपालन मजबूत करण्याच्या आणि अनुमानित करआकारणी योजनेच्या संभाव्य गैरवापराला आळा घालण्याच्या उद्देशाने, प्राप्तिकर विभागाने अनुमानित करआकारणी योजनेची निवड करणाऱ्या व्यक्ती आणि व्यावसायिकांना प्राप्तिकर विवरणपत्र भरताना त्यांच्या गुंतवणुकीचा आणि मालमत्तेचा तपशील देणे (प्रकटीकरण) आवश्यक केले आहे. हा बदल केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) संबंधित मूल्यांकन वर्षासाठी अधिसूचित केलेल्या अद्ययावत आयटीआर-४ (सुगम) फॉर्ममध्ये समाविष्ट आहे.