

Reliance Jio IPO 2026 Is It Worth Applying Key Details on Issue Price Valuation and Investment Risks for Retail Investors in India
sakal
- नंदिनी वैद्य, ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार INA000008880
रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म्सचा ‘आयपीओ’ २१ ते २३ ऑक्टोबर दरम्यान १०६५ रुपये ते १११९ रुपये प्रतिशेअर भावाने प्राथमिक बाजारात विक्रीसाठी येत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे भागधारक हे खास भागधारक कोट्यामधून दोन लाख रुपयांपर्यंत अर्ज करू शकतील. या ‘आयपीओ’त सर्व नवे शेअर असून, यात ‘ऑफर फॉर सेल’ नाही. मेटा, गुगल, केकेआर अशा महारथींचा कंपनीमध्ये हिस्सा आहे, ही एक उल्लेखनीय बाब आहे. आजच्या काळात माणसाच्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांमध्ये मोबाइलची भर पडली आहे, असे म्हटले जाते. मुकेश अंबानी यांनीही मागेच ‘डेटा इज न्यू ऑइल’ (data is the new oil) असे सांगितले होते. यावरून भारतीय दूरसंचार क्षेत्राच्या व्याप्तीचे महत्त्व लक्षात यावे.