
नवी दिल्लीः अब्जाधीश लॅरी एलिसन यांच्यासाठी २०२५ हे वर्ष अतिशय फायद्याचं ठरलं आहे. मागच्या काही दिवसांमध्ये त्यांनी जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांना मागे टाकत अचानक नंबर एकची खुर्ची मिळवली होती. आता त्यांनी आणखी एक असा निर्णय घेतलाय, त्यामुळे जगभरात चर्चा होतेय.
सध्या टॉप १० अब्जाधीशांच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर असलेले ओरॅकलचे संस्थापक लॅरी एलिसन यांनी आपली ९५ टक्के संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सच्या माहितीनुसार, त्यांची एकूण संपत्ती ३५८ डॉलर इतकी आहे.