
सुहास राजदेरकर
suhas.rajderkar@gmail.com
प्रसिद्ध अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि तिचे सहकारी बूच विल्मोर पाच जून २०२४ रोजी जेव्हा आठ दिवसांच्या अंतराळ संशोधन मिशनवर निघाले, तेव्हा त्यांना आपण तब्बल २८६ दिवसांनी पृथ्वीवर परत येऊ, याची सुतराम कल्पना नव्हती आणि पुढे जे काही घडले त्याने अंतराळविश्वात इतिहास निर्माण झाला, जो सर्वांना माहिती झाला आहे. या सर्वांचा गुंतवणूकविश्वाशी घनिष्ठ संबंध जोडता येतो आणि यातून सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी शिकण्यासारखे भरपूर आहे.