

Life Insurance Claim Rejection Concealment
Sakal
कोणतीही विमा पॉलिसी घेताना इच्छुक विमेदाराने प्रपोजल फॉर्ममध्ये आपले आरोग्य, आजार, सवयी आदींविषयी संपूर्ण खरी माहिती देणे आवश्यक असते. कोणतीही महत्त्वाची माहिती लपविली आणि खोटेपणा केला, तर पॉलिसी रद्द होऊन विमेदाराचेच नुकसान होते. याचा हा धडा...
ही वर्षांपूर्वीची गोष्ट. सोमवारची सकाळची वेळ. मुंबईमध्ये मुलुंडहून वरळीच्या दिशेने एक टॅक्सी धावत होती. टॅक्सीत मागील बाजूस नाईक पती-पत्नी बसले होते. टॅक्सीचा वेग थोडा जास्तच होता. अचानक पुढे थांबलेल्या एका गाडीशी होणारी टक्कर टाळण्याचा प्रयत्न करत असताना टॅक्सी रस्त्याच्या दुभाजकावर आदळून अपघात झाला.