Car Loan फेडल्यानंतर ‘हे’ काम करायला विसरू नका, भविष्यात येऊ शकतात अडचणी

कार लोन Car Loan फेडल्यानंतर आणि बँकेकडून एनओसी NOC घेतल्यानंतरही तुम्हाला आणखी एक प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं असतं
कार वरचा बोजा
कार वरचा बोजाEsakal
Updated on

अनेकजण कार खरेदी करण्यासाठी कार लोन घेत असतात. मग ती बेसिक कार असो किंवा प्रिमियम आणि लक्झरी Luxury Car. कार लोनमुळे आपल्या स्वप्नातील कार घेणं शक्य होतं. Car Laon संपूर्ण फेडल्यानंतर म्हणजेत लोन संपल्यानंतर बँकेकडून NOC घ्यावी लागते. Car Tips cancel hypothecation of car loan from RTO

लोन फेडलं आणि बँकेकडून एनओसी घेतली की आता आपण मोकळे झालो असा अनेकाचा समज असतो. मात्र हा समज अत्यंत चुकीचा आहे. कार लोन Car Loan फेडल्यानंतर आणि बँकेकडून एनओसी NOC घेतल्यानंतरही तुम्हाला आणखी एक प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं असतं. त्याशिवाय बँकेतील तुमच्या नावावर असलेलं लोन क्लोज Loan Closure होणार नाही.

कार लोन पूर्ण झाल्यानंतर करायचं एक महत्वाचं काम म्हणजेच हाइपोथिकेशन रिमूव्हल (Hypothecation Removal). जेव्हा तुम्ही कार खरेदी करत असता. तेव्हा RTO रेकॉर्डमध्ये तुम्ही घेतलेल्या कारलोनचा तपशील असतो. म्हणजेच बँकेची माहिती असते. हाइपोथिकेशन रिमूव्हल म्हणजेच तुमच्या RC बुकवरून तुमच्या बँकेचा तपशील काढून टाकणं. हे काम पूर्ण न केल्यास RTO रेकॉर्डमध्ये तुमच्या नावावर कारची नोंद होणार नाही.

यासाठीच कार लोन पूर्ण होताच ही प्रकिया पूर्ण करणं गरजेचं आहे. अन्यथा भविष्यात कार विकायची असल्यास अथवा कार चोरीला गेल्यास मोठी अडचण निर्माण होवू शकते.

कार वरचा बोजा
Car Loan Tips : या गोष्टींचा विचार करा मगच कार लोन घ्या, नंतर पश्चाताप होणार नाही!

अशी पूर्ण करा Hypothecation Removal ची प्रक्रिया

ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला वेळोवेळी RTO ऑफिसला जाण्याची आवश्यकता नाही. घरबसल्या ऑनलाइन तुम्ही प्रक्रिया करू शकता. यासाठी काही स्टेप्स फॉलो करा.

- बँकेकडून NOC मिळाल्यानंतर parivahan.gov.in या संकेत स्थळाला भेट द्या.

- इथे तुम्हाला अकाऊंट तयार करावं लागेल.

- अकाउंट तयार झाल्यावर Vehicle Related Services वर क्लिक करून Hypothecation Termination ची माहिती भरा.

- Hypothecationसाठी लागणारी सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन फी जमा करावी लागेल. पेमेंट झाल्यानंतर मिळालेल्या रिसिप्टची प्रिंट काढा.

- त्यानंतर पेमेंट स्लिपची फोटोकॉपी, ओरिजनल RC, NOC ची कॉपी तसचं PUC आणि इंश्युरन्सची कॉपी तुमच्या RTO ऑफिसला स्पीडपोस्टाने पाठवा.

ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर काही दिवसात आरटीओ कार मालकाच्या नावाने नवं आरसी बुक RC Book जारी करून ते रजिस्टर पत्त्यावर पाठवून देतं. अशा प्रकारे तुम्ही सहज ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.

मात्र कार लोन संपताच ही प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे. अन्यथा कार विकताना तुम्हाला अडचण निर्माण होवू शकते. कारण हायपोथिकेशन रिमूव्हल केल्याशिवाय आरसी ट्रान्सफर होत नसल्याने तुम्ही कार विकू शकतं नाही.

लक्षात ठेवा बँकेकडून इश्यू करण्यात आलेलं NOC तीन महिन्यांसाठी वॅलिड असल्याने या काळामध्ये तुम्हाला हायपोथिकेशन रिमूव्हलची प्रक्रिया पूर्ण करू शकता. अन्यशा तुम्हा बँकेकडून पुन्हा NOC काढावी लागू शकते. त्यामुळे वेळीत ही प्रक्रिया पूर्ण करा.

हे देखिल वाचा-

कार वरचा बोजा
Used Car Loan : सेकंड हँड कारसाठी लोन घेताय? 'या' गोष्टींची खबरदारी घ्या, होईल मोठा फायदा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com