Gold Loan चे फायदे, लोन घेण्यापूर्वी या गोष्टींची घ्या दखल

इमरजन्सीसाठी गोल्ड लोन एक चांगला आणि सुरक्षित पर्याय आहे. गोल्ड लोनचे अनेक फायदे आहेत. मात्र लोन घेत असताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. याबद्दल जाणून घेऊ
माहिती सुवर्ण कर्जाची
माहिती सुवर्ण कर्जाचीEsakal

अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी कागदपत्रांच्या मदतीने जर तुम्हाला कर्ज Loan हवं असेल तर गोल्ड लोन हा एक उत्तम पर्याय आहे. एखाद्या बँकेमध्ये Bank तुमचं एखादं कर्ज सुरू असेल किंवा तुमचा सिबिल स्कोर चांगला नसेल तरी तुम्ही गोल्ड लोन सहज घेऊ शकता. Know the process to avail Gold loan from Banks or Financial Institutions

सध्याच्या घडीला सोन्यावर चालू दराच्या ८० टक्क्यांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिलं जातं.

या कर्जामध्ये सिक्युरिटी म्हणून तुम्ही तुमचं सोनं Gold ठेवत असल्याने अगदी कमी कागदपत्रांची आवश्यकता असते.

शिवाय अनेक बँक Banks किंवा फायनेंशियल कंपन्या जवळपास तासाभरामध्ये लोनची प्रक्रिया पूर्ण करून तासाभरात डिसबर्समेंट करतात.

म्हणजेच तासाभरामध्ये तुम्हाला पैसे उपलब्ध होतात. त्यामुळे इमरजन्सीसाठी गोल्ड लोन एक चांगला आणि सुरक्षित पर्याय आहे. गोल्ड लोनचे अनेक फायदे आहेत. मात्र लोन घेत असताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. याबद्दल जाणून घेऊ यात.

सोनं सुरक्षित राहील

ग्लोड लोन घेत असताना तुम्ही दिलेले तुमचे सोन्याचे दागिने हे अत्यंत सुरक्षितरित्या ठेवले जातात. कर्जासाठी देण्यात आलेले दागिने एका सेफमध्ये तुमच्यासमेर सील करून ठेवले जातात. ही सेफ स्ट्राँगरूममध्ये ठेवली जाते. इथं कायम मोठी सुरक्षा असते.

तसंच कर्जाची परतफेड करताना तुमचं सोन तुम्हाला परत करणं बँक किंवा फायनंन्स कंपन्यांना बंधनकारक असतं. लोन फेडल्यानंतर किंवा पूर्ण झाल्यानंतर ही हे सील केलेलं सोन तुम्हाला पुन्हा दिलं जातं.

तसंच सोनं देताना सर्व दागिन्यांचं एक्सपर्टकडून वजन केलं जातं. तसंच त्याची शुद्धता तपासली जाते. तर सोन परत करताना देखील त्याचं वजन पुन्हा तपासलं जातं.

हे देखिल वाचा-

माहिती सुवर्ण कर्जाची
Kolhapur Gold Biscuits : तळ्याकाठी खेळताना मुलांना सापडली 24 लाख किमतीची सोन्याची बिस्किटे; 'त्यांना' सुगावा लागताच..

पर्सनल लोनपेक्षा गोल्ड लोन फायदेशीर

पर्सनल लोनच्या तुलनेत गोल्ड लोन घेण अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतं. पर्सनल लोनला तुम्हाला इनकम सोर्स, सॅलरी स्लीप याशिवाय अनेक कागदपत्रांची आवश्यकता भासू शकते. मात्र गोल्ड लोन हे तुमच्याकडे असलेल्या सोन्यावर अवलंबून असतं.

तसंच अलिकडे बँक आणि फिनटेक कंपन्यांनी गोल्ड लोनच्या व्याजदरातही मोठी कपास केली आहे. अगदी ८.५ टक्के व्याजदरापासून गोल्ड लोन दिलं जातं. ८.५ ते १६ टक्के असे गोल्ड लोनचे व्याज दर आहे. तसचं महिलांना व्याजदरामध्ये विषेश सूटही दिली जाते. त्यामुळे पर्सनल लोनएवजी गोल्ड लोन घेणं जास्त फायदेशीर ठरतं.

रिपेमेंटचे पर्याय

गोल्ड लोन रिपेमेंटचे विविध पर्याय उपलब्ध आहे. काही लेंडर्स लोनच्या प्रिपेंटवर कोणतीही फी घेत नाहीत. तर काही मात्र प्रिपेमेंट किंवा अवधीपूर्वी लोन क्लोज केल्यास २ते ४ टक्के प्रोसेसिंग फी आकारतात.

ड्यू डेटनंतरही मिळतो अवधी

काही वेळेस लोनच्या ड्यू डेटनंतर म्हणजे लोनचा कालावधी संपल्यानंतरही काही जणांना लोन फेडणं शक्य होत नाही. मात्र अशा वेळी आपलं सोन आता हातातून गेलं अशी चिंता करण्याची आवश्यकता नाही. कारण यानंतरही बँका किंवा फिनटेक कंपन्या कर्जदाराला काही दिवसांची अवधी वाढवून देतात. अर्थात या कालावधीतही व्याज आकारलं जातं.

त्यानंतरही कर्ज फेडण्यासाठी किमान २ नोटीसा पाठवल्या जातात. यानंतरही जर कर्जदाराने कर्ज फेटलं नाही तर त्याचं तारण ठेवलेल्या सोन्याचा लिलाव करण्याचा बँकेला हक्क असतो.

गोल्ड लोन घेताना घ्या काळजी

- गोल्ड लोन घेत असताना मात्र नावाजलेल्या बँक किंवा फिनटेक कंपनीकडून कर्ज घ्या. यामुळे सुरक्षिततेची हमी राहते.

- कर्ज घेत असताना प्रिपेमेंट आणि फोल क्लोजर सारख्या महत्वाच्या गोष्टींबद्दलचे नियम व अटी समजून घ्या.

- कमी व्याजदर देणाऱ्या बँका आणि कंपन्यांची माहिती घेऊन मग योग्य पर्याय निवडा.

- तसंच व्याजदर कमी करण्यासाठी तुम्ही लोन देणाऱ्या अधिकाऱ्याशी चर्चा करू शकता.

हे देखिल वाचा-

माहिती सुवर्ण कर्जाची
Gold Jewelry Cleaning: तुमचे सोन्याचे दागिने फिके पडले आहेत? मग या उपायांनी पुन्हा चमकेल सोनं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com