
सुधाकर कुलकर्णी- सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर-सीएफपी
सायबर फसवणुकीबाबतच्या बातम्या आजकाल वरचेवर वाचनात येतात. विशेष म्हणजे बँक खात्याशी संबंधित सायबर फसवणूक खूप मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येते. अलीकडेच म्हणजे चार-पाच महिन्यांपूर्वी आयसीआयसीआय बँकेच्या राजस्थानमधील कोटा शहरातील रिलेशन मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या एका २६ वर्षे वयाच्या मुलीने सुमारे रु. ४.५८ कोटी इतक्या रकमेचा अपहार केल्याचे वाचनात आले होते. आपल्या बँकेच्या खातेदारांच्या मुदत ठेवी (एफडी) ऑनलाइन पद्धतीने मोडून त्यातील रक्कम स्वत:च्या फायद्यासाठी शेअर बाजारामधील एफ अँड ओ (फ्युचर्स अँड ऑप्शन) व्यवहारांसाठी वापरली. विशेष म्हणजे यातील बहुतेक ठेव खाती ज्येष्ठ नागरिकांची होती, ज्यांना ऑनलाइन बँकिंग/नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगबाबत माहिती नव्हती.