

Maharashtra Budget For Health 2026
sakal
Maharashtra Health Budget 2026: आज 2026–27 या आर्थिक वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर यंदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडला. यावेळी त्यांनी राज्यातील आरोग्य सुविधा अधिक मजबूत करण्यावर विशेष भर दिला आहे. ग्रामीण तसेच शहरी भागात दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजना जाहीर करण्यात आल्या.