Manorama Industries processes forest-based oilseeds to manufacture cocoa butter equivalents and specialty fats.
esaskal
भूषण ओक
शेअर बाजार विश्लेषक
मनोरमा इंडस्ट्रीज या कंपनीची स्थापना २००५ मध्ये झाली. रायपूर, छत्तीसगड येथे मुख्यालय असलेल्या या कंपनीच्या व्यवसायाची सुरुवात भारतीय जंगलांमध्ये उपलब्ध होणाऱ्या साल, कोकम, महुआ, धूप, आंब्याच्या कोयी आणि इतर तेलबियांचे संकलन व प्रक्रिया करण्यापासून झाली. आता मोठा व्यवसायविस्तार करून कंपनी भारताबरोबरच आफ्रिकेतील अनेक देशांमधून स्थानिक शिया वृक्षांच्या बियांचे संकलन करून त्या भारतात आयात करते.