

Nominee Change After Marriage: A Must for Financial Security
Sakal
-ॲड. रोहित एरंडे, कायद्याचे जाणकार
हिंदू वारसा हक्क कायद्याप्रमाणे एखाद्या हिंदू पुरुषाचे इच्छापत्र न करता निधन झाल्यास त्याच्या मिळकतीचे वारसदार असणाऱ्या क्लास-१ वारसांमध्ये पत्नी आणि मुले यांच्याबरोबरच सामान हिस्सेदार म्हणून आईचादेखील समावेश होतो. वडिलांचा समावेश क्लास-२ मध्ये होतो. लग्नापूर्वी नॉमिनी म्हणून आई-वडिलांचे नाव लावले असले, तरीही लग्नानंतर वैवाहिक जोडीदारालाही सर्वसाधारण भविष्यनिर्वाह निधीमध्ये (General Provident Fund- जीपीएफ) समान हिस्सा मिळतो का, असा प्रश्न नुकताच सर्वोच्च न्यायालयापुढे उपस्थित झाला.