

Meta Layoffs
ESakal
मेटा सध्या कर्मचारी कपातीच्या विध्वंसाचा सामना करत आहे. माजी कर्मचारी अॅडेल वू यांनी उघड केले की, कंपनीतील पहिल्या मोठ्या कर्मचारी कपातीच्या आदल्या दिवशी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या बॅगमध्ये मोफत स्नॅक्स, पेये आणि चार्जर भरले होते. अॅडेल वू यांनी त्या दिवसाचे वर्णन प्रलयकाळ असे केले. अलीकडेच, मेटा कंपनीची माजी कर्मचारी अॅडेल वू हिने तिच्या 'एक्स' नावाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये एक धक्कादायक खुलासा करून सर्वांना चकित केले.