

Mexico Tarrif
Sakal
Maxico 50% Tariff Attack : जगभरात पुन्हा एकदा टॅरिफ वॉर सुरू होताना दिसत आहे. अमेरिकेने आधीच अनेक देशांवर आयात शुल्क वाढवून त्यांना मोठा झटका दिला होता, आणि आता त्यांचा शेजारी देश मेक्सिकोनेही तसाच मोठा निर्णय घेतला आहे. मेक्सिकोने चीनसह अनेक आशियाई देशांमधून येणाऱ्या वस्तूंवर 50% पर्यंत उच्च टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेसारखाच हा टॅरिफ दर असेल. मेक्सिकोच्या सेनेटने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे आणि हे नवे टॅरिफ पुढील वर्षी म्हणजे 2026 पासून लागू होणार आहेत.