Microfinance
sakal
- तपोब्रत चौधरी, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड (BFIL)
१. जवळपास दोन वर्षांनंतर मायक्रोफायनान्स क्षेत्रातील कर्जपुरवठ्यात सुधारणेची चिन्हे दिसत आहेत. या वाढीला कोणत्या घटकांमुळे चालना मिळत आहे?
गेल्या काही वर्षांत मायक्रोफायनान्स क्षेत्राला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. मात्र, कर्जपुरवठा करणाऱ्या संस्थांनी केलेल्या सुधारणांचे परिणाम आता दिसू लागले आहेत. संपूर्ण क्षेत्रात ग्राहकांची निवड, पतमूल्यांकन आणि क्रेडिट ब्युरोच्या माहितीचा वापर याबाबत अधिक शिस्त पाळली जात आहे. नवीन कर्ज मंजूर करण्यापूर्वी कर्जदारावरील एकूण कर्जाचा बोजा तपासण्यावरही संस्था अधिक भर देत आहेत.
त्याचबरोबर कर्जफेडीबाबतची शिस्त सुधारली आहे. त्यामुळे कर्जपुरवठा करणाऱ्या संस्थांचा सावधपणे व्यवसायविस्तार करण्याविषयीचा विश्वास वाढला आहे.
मायक्रोफायनान्स क्षेत्रातील कर्जाची गरज कधीच संपलेली नव्हती, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. कुटुंबांना आणि सूक्ष्म उद्योजकांना उपजीविकेसाठी तसेच व्यवसायवाढीसाठी सातत्याने भांडवलाची गरज असते. अलीकडच्या काळात कर्जवाटपाच्या पोर्टफोलिओमध्ये झालेली वाढ आणि मालमत्तेच्या गुणवत्तेत झालेली सुधारणा यावरून हे क्षेत्र अधिक सक्षम आणि शाश्वत स्थितीकडे वाटचाल करत असल्याचे दिसते.