

Lifestyle Inflation is one of the biggest reasons why many salaried professionals struggle to save even after receiving higher salaries.
Sakal
डॉ. वीरेंद्र ताटके, तवणूक विषयाचे अभ्यासक
बंगळूर शहरात एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणारा एक तरुण सुट्टीच्या दिवशी रॅपिडो बाईक टॅक्सीचा चालक म्हणून काम करत असल्याची बातमी अलीकडेच चर्चेत आली. विशेष म्हणजे हा तरुण चांगला पगार कमावतो, तरीही तो आर्थिक सुरक्षितता निर्माण करण्यासाठी हे काम करतो, असे त्याने सांगितले. समाज माध्यमाद्वारे ही घटना काही तासांतच वाऱ्यासारखी पसरली आणि वाढती महागाई, वाढलेला शहरी जीवनखर्च आणि आर्थिक सुरक्षिततेबाबतच्या मुद्द्यांवर चर्चा सुरू झाली.