
Momentum investing — capturing profits by following the strength of market trends.
Sakal
-राजेंद्र केळकर, संचालक, केळकर इन्व्हेस्टमेंट्स
एखादा खेळाडू फॉर्मात आहे किंवा ‘आउट ऑफ फॉर्म’ असल्याचे क्रिकेटविश्वात आपण अनेकदा ऐकत असतो. जो खेळाडू चांगली कामगिरी करत असतो, तो फॉर्ममध्ये असतो. साहजिकच संघाच्या विजयाची शक्यता वाढविण्यासाठी या खेळाडूची अंतिम अकरा खेळाडूंमध्ये निवड केली जाते. ज्यांची कामगिरी चांगली होत नाही, त्यांना सामान्यतः फॉर्म परत येईपर्यंत विश्रांती देण्यात येते. मोमेंटम इन्व्हेस्टमेंटमध्ये याच तत्त्वज्ञानाचे अनुसरण करण्यात येते. त्यात चांगली कामगिरी करणाऱ्या किंवा ‘फॉर्म’मध्ये असलेल्या शेअरची निवड करण्यात येते आणि सुस्तावलेल्या शेअरना वगळण्यात येते. या धोरणामुळे बाजारपेठेच्या गतीवर स्वार होण्याचे आणि त्याचा फायदा घेण्याचे सामर्थ्य पोर्टफोलिओला येते.