Premium|Watech Wabag Share Price Target : दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी कोणते शेअर घ्यावेत?

Apollo Hospitals Stock Analysis Motilal Oswal : वाटेक वाबाग आणि अपोलो हॉस्पिटल्सची भक्कम तिमाही कामगिरी; मोतीलाल ओसवालच्या सिद्धार्थ खेमका यांच्याकडून उत्तम ऑर्डर बुक व नफाक्षमतेच्या बळावर पुढील एका वर्षासाठी खरेदीची शिफारस.
Apollo Hospitals Stock Analysis Motilal Oswal

Apollo Hospitals Stock Analysis Motilal Oswal

esakal

Updated on

सिद्धार्थ खेमका मोतीलाल ओसवाल - फायनान्शियल सर्व्हिसेस लि.

सध्या कंपन्यांच्या एप्रिल-जून तिमाही निकालांचा हंगाम सुरू असून, अनेक कंपन्यांनी अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी नोंदविली आहे. भक्कम ऑर्डर बुक, नफ्यातील वाढ, विस्ताराच्या योजना आणि सुदृढ आर्थिक स्थितीच्या बळावर काही कंपन्यांकडून पुढील दोन-तीन वर्षांत सातत्यपूर्ण वाढीची अपेक्षा आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजारात देशांतर्गत गुंतवणूकदारांचा सकारात्मक दृष्टिकोन दिसत आहे. या पार्श्वभूमीवर, निवडक दहा शेअरची शिफारस करण्यात आली आहे. (उद्दिष्टपूर्तीचा कालावधी : एक वर्ष)

वाटेक वाबाग (उद्दिष्ट : रु. २५२९)

वाटेक वाबाग कंपनीने आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या चौथ्या तिमाहीत भक्कम कामगिरी केली आहे. कंपनीकडे शाश्वत ऑर्डरचा मजबूत ओघ असून, परदेशी बाजारपेठा आणि औद्योगिक प्रकल्पांमधील वाढत्या सहभागामुळे उत्पन्नात सातत्याने वाढ होत आहे. नफाक्षम संधींवर असलेल्या भरामुळे आर्थिक वर्ष २०२५-२६ ते २०२७-२८ या कालावधीत कंपनीचा महसूल, व्याज, कर, घसारा व कर्जमाफीपूर्व नफा (ईबीआयटीडीए) आणि निव्वळ नफा यांचा चक्रवाढ वार्षिक विकासदर (सीएजीआर) अनुक्रमे १८ टक्के, २४ टक्के आणि २० टक्के राहण्याचा अंदाज आहे. प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी, सातत्यपूर्ण कामगिरी आणि सुदृढ रोकडनिर्मितीच्या बळावर या शेअरवरील खरेदीची शिफारस कायम आहे.

अपोलो हॉस्पिटल्स (उद्दिष्ट : रु. १०,१२०)

अपोलो हॉस्पिटल्सने चौथ्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा सरस कामगिरी केली आहे. महसूल, ईबीआयटीडीए आणि निव्वळ नफा यामध्ये अनुक्रमे ३.५ टक्के, १० टक्के आणि १३ टक्के वाढ झाली आहे. हेल्थकेअर सर्व्हिसेस, हेल्थको आणि एएचएलएल या तिन्ही प्रमुख व्यवसायांनी मजबूत वाढ आणि सातत्यपूर्ण नफाक्षमता दाखविली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ ते २०२७-२८ या कालावधीत महसूल आणि ‘ईबीआयटीडीए’चा चक्रवाढ वार्षिक विकासदर अनुक्रमे सुमारे १३ टक्के आणि १६ टक्के राहण्याचा अंदाज आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com