

Mukesh Ambani’s CAMPA Shakes Coke & Pepsi Market Share in India
Sakal
Mukesh Ambani's CAMPA has stunned Coke and Pepsi : भारताच्या 60,000 कोटी रुपयांच्या सॉफ्टड्रिंक मार्केटमध्ये मोठा बदल दिसत आहे. चालू वर्षातील तीन तिमाहींमध्ये मुकेश अंबानींच्या कॅम्पा आणि वर्लिनवेस्टच्या लाहौरी जिरा यांनी कोक व पेप्सीसारख्या मल्टीनेशनल कंपन्यांच्या बाजारातील पकड हलवून ठेवली आहे. दोन्ही दिग्गज कंपन्यांची मार्केट शेअर 93% वरून 85% वर आली आहे. त्यामुळे कॅम्पा भारतीय सॉफ्टड्रिंक मार्केटमध्ये जोरदार उभारी घेत आहे हे स्पष्ट होत आहे.