

How Multi-Asset Funds Reduce Risk
E sakal
A Complete Guide to Multi-Asset Allocation Funds in India
आशुतोष दाबके
Ashutosh@wealthgrowth.in
सोन्यात गुंतवणूक करावी, की शेअरमध्ये? प्रॉफिट बुक करताना फायद्यावर टॅक्स द्यावा लागणार नाही, असा काही उपाय आहे का? अशा एक ना अनेक प्रश्नांचे समाधानकारक उत्तर म्हणजे मल्टी-अॅसेट अॅलोकेशन फंड. महाराष्ट्रीय थाळीप्रमाणे ‘मल्टी अॅसेट अॅलोकेशन फंड’ या एका फंडात गुंतवणूक केल्याने विविध मालमत्ता प्रकारांमध्ये एकाचवेळी गुंतवणूक होऊ शकते. त्यामुळे स्थैर्य, जोखीम व्यवस्थापनाचे उद्दिष्ट यातून साध्य होते.
भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने केलेल्या म्युच्युअल फंड योजनांच्या वर्गवारीनुसार मल्टी-अॅसेट अॅलोकेशन फंड या वर्गवारीतील योजनांनी कमीत कमी दहा टक्के रक्कम तीन वेगवेगळ्या मालमत्ता प्रकारांमध्ये म्हणजेच अॅसेट क्लासेसमध्ये गुंतवणे आवश्यक आहे. ही गुंतवणूक शेअर (इक्विटी), कर्जरोखे (डेट), सोने, चांदी; तसेच इतर कमोडिटीज, आरईआयटी आणि इनव्हिटमध्ये केली जाते.
‘आखूड शिंगी बहु दुधी’ अशा प्रकारचा हा एक गुंतवणुकीचा पर्याय आपल्या सर्वांना उपलब्ध आहे. या एका फंडामध्ये गुंतवणूक करून तीनपेक्षा जास्त मालमत्ता प्रकारांमध्ये गुंतवणूक करणे शक्य होते. हा प्रकार गुंतवणूकदाराला इक्विटीमार्फत वाढीच्या संधी आणि सुरक्षा याचे संतुलन देतो. मल्टी ॲसेट फंडाचे हायब्रिड फंड प्रकारामध्ये वर्गीकरण केले जाते. त्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या मालमत्तेच्या टक्केवारीनुसार त्यांचे हायब्रिड फंडामधील प्रकार आणि त्यांना लागू असणारे कर बदलतात.